मुंबई, दादासाहेब येंधे : गुन्हे शाखेच्या युनिट-७ ने साकिनाका परीसरातील एका हॉटेलवर कारवाई करत उत्तर परदेशातील एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. मनीष सहानी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून दोन अटोमॅटिक पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही शस्त्रे विकण्यासाठी तो आल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट-७ ला साकिनाका येथील अशफाक गाव परिसरातील अशोका इन हॉटेलमध्ये एक व्यक्ती शास्त्रांसह राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे युनिट-७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हॉटेलवर छापा टाकला.

0 टिप्पण्या