मुंबई, दादासाहेब येंधे : साकीनाका पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करीत २२ किलो चांदीचा एकूण ४६ लाखांचा मुद्देमाल २४ तासांच्या आत हस्तगत केला असून मुंबई, ठाणे परिसरातून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २५ ते २६ जुलैच्या कालावधीत असल्फा, अंधेरी-घाटकोपर रोडवरील अनिस कंपाऊंड येथील एस.पी. एंटरप्राईजेस या दुकानात चोरी झाली होती. कार्यालयातील ड्रॉवर मध्ये ठेवलेली दोन लाखांची रोकड, कपाटातील २२ किलो चांदीचे सुमारे ४४ लाख रुपये किंमत असलेली मालमत्ता तसेच दुकानात झोपलेले कामगारांचे दोन मोबाईल असे एकूण ४६ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. कौसा-मुंब्रा, भांडुप आणि गोवंडी येथे स्वतंत्र कारवाई करून रमजान मकसूद साह (वय,२०), जिशान अब्दुल साबूध खान (वय, २९), अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान (वय, २७) आणि इरफान नुरउल्ला खान (वय, २६) या चार आरोपींना अटक करण्यात आली असून हे सर्वजण उत्तर प्रदेश मध्ये राहणारे आहेत.

0 टिप्पण्या