Ticker

6/recent/ticker-posts

गुन्हे शाखेने ६६५ कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट

मुंबई, दादासाहेब येंधे : अंमली पदार्थाविरोधातील कारवाईला अधिक बळ देत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने विविध गुन्हामध्ये जप्त करण्यार आलेल्या तब्बल ६६५ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थ जाळून नष्ट केले.


सदर कारवाई शनिवारी तळोजा येथील प्रकल्पात कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून करण्यार आली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालामध्ये १,२७७ किलो वजनाचे कोकेन, मेफेड्रॉन, गांजा, चरस, हेरोईन, इफेड्रीन पावडर, हायड्रो गांजा तसेच ५,६०६ कोडिनमिश्रित बाटल्यांचा समावेश होता. या सर्व अमली पदार्थाची एकूण किंमत ६६५ कोटी रुपये इतकी आहे. हा मुद्देमाल आवश्यक कायदेशीर कार्यावाही पूर्ण करून बंदिस्त भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला. पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे ) अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी घटक स्तरीय  ड्रग्ज डिस्पोजल कमिटीचे अध्यक्ष डॉ. मनोज कुमार शर्मा यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कार्यावाही करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या