Ticker

6/recent/ticker-posts

अपहरण करून ३२ लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : अँटॉप हिल येथून पायी चालत जात असलेल्या तक्रारदाराचे वाहनातून अपहरण करून त्याच्या जवळून ३२ लाख रुप्यामची रोकड घेऊन पसार झालेल्या सहा जणांच्या टोळीला अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे. पोलीसांनी आरोपीकडून २९ लाखाहून अधिक रक्कम जप्त केली आहे.

श्रवण लक्ष्मण रावल (वय, ४५) हे विरार येथे राहणारे कर्मचारी येथून पायी जात असताना चार अनोळखी इस्मानी त्यांची चारचाकी गाडी अडवून त्यांचे अपहरण केले. रावल यांना धमकी देऊन त्यांच्या ताब्यातील ३२ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम काढून त्यांना घाटकोपर परिसरात सोडून दिले. रावल यांनी याप्रकरणी  अँटॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.

हा गुन्हा अतिशय क्लिष्ट असल्याने व गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने कोणतेही धागेद्वारे प्राप्त होत नव्हते. अशातच राहुल यांच्या कंपनीमधून मागील एक वर्षांमध्ये नोकरी सोडून गेलेल्या आठ लोकांची माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यावरून एका संशयित व्यक्तीची गुप्त माहिती मिळाली. या व्यक्तीस गुप्त बातमीदाराच्या मदतीने चेंबूर परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याच्यासह इतर सात गुन्हेगारांनी हा गुन्हा केल्याचे कबुली दिली. पोलिसांनी पुढील कारवाई करत एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. राहुल गायकवाड, इरफान अली खान, विवेक काकडे, संतोष मलेकर, स्वप्निल पाटील, मोहम्मद अन्सार अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून २९ लाख ६९ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या