Ticker

6/recent/ticker-posts

स्पोर्टस बाईक चोरणाऱ्या दोन आरोपींना साकीनाका पोलिसांकडून अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : स्पोर्टस बाईक जोडणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना साकीनाका पोलिसांनी दहिसर आणि राजस्थान मधून अटक केली आहे. आरोपीकडून २३ लाख ८९ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त केल्या असून या कारवाईत मुंबई शहर तसेच उपनगरातील एकूण १५ गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी कळवले आहे.

२२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्रीच्या वेळेस अंधेरी घाटकोपर लिंक रोडवरील बिलाल मशिदी समोर उभी केलेली रॉयल 'एनफिल्ड इंटरसेप्टर ६५०' एका अनोळखी व्यक्तीने चोरून नेल्याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तांत्रिक तपास व माहितीच्या आधारे पोलिसांनी मिराज उर्फ बवाल मोहम्मद रईस खान (वय, २६, रा. ठाणे) याला दहिसर येथून अटक केली. त्याच्या चौकशीत उमेर आमीन शेख यांचा सहभाग आढळून आला. त्याला पोलिसांनी राजस्थान येथे जाऊन अजमेर मधून अटक केली.


आरोपींनी चोरलेल्या 'रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर ६५०', हंटर३५०, 'यामाहा एमटी-१५', आणि आर-१५ अशा एकूण ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. खान याने एकूण १५ मोटरसायकली चोरी करून त्या शेख याला विकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पुढील तपास केला असता साकीनाका येथील १०, तसेच व्ही. बी. नगर, कुर्ला, सायन व धारावी पोलीस ठाण्यातील पाच गुन्ह्यांचा छडा या कारवाईमुळे लागला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या