Ticker

6/recent/ticker-posts

सराईत मोबाइल चोरांच्या मुसक्या आवळल्या

मुंबई : मोबाइल चोरणाऱ्या दोन सराईत आरोपींना बांगूर नगर पोलिसांनी नुकत्याच मुसक्या आवळल्या आहेत. संदीप मोहिते (वय ३६), सोहेल खान (वय २५) अशी त्यांची नावे आहेत. तर संदीप मोहिते हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये ३३ गुन्हे दाखल असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.

रिक्षाचालक मनोजकुमार साव हा  ११ नोव्हेंबर रोजी गोरेगाव येथील भगतसिंग नगर-२ परिसरात प्रवाशांची वाट पाहत होता. त्यावेळी त्याने रिक्षाच्या स्टिअरिंगवर मोबाइल रबरामध्ये अडकवला होता. त्याच्या नकळत चोरांनी मोबाइल पळविला. या प्रकरणी त्याने त्वरित बांगूर नगर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून सोहेल खान याला ताब्यात घेतले. त्याने संदीप मोहिते याची माहिती देताच त्यालाही अटक करण्यात आली.

संदीप मोहितेवर बांगूर नगर येथे २०, गोरेगावमध्ये १२ तर कस्तुरबा मार्ग पोलिसांत एक गुन्हा दाखल आहे. मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत. परिमंडळ-११ चे डीसीपी संदीप जाधव आणि बांगूर नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या