Ticker

6/recent/ticker-posts

डिजिटल अरेस्टची धमकी देऊन सव्वाकोटीची लूट करणाऱ्यांना जळगावमधून अटक

मुंबई, (दादासाहेब येंधे) : वृद्धेला डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देणाऱ्या दोन जणांना जळगावमधून अटक करण्यात आली आहे. या दोघांनी डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देत वृद्धेला तब्बल सव्वाकोटींची फसवणूक केली होती.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे जळगावमधून रोहित संजय सोनार आणि हितेश पाटील यांना अटक केली.

तक्रारदार महिला ७२ वर्षांची असून ती पश्चिम उपनगरात राहते. ८ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तिला मुंबईसह दिल्ली पोलीस, सीबीआय आणि मुंबई उच्च न्यायालयातून बोलत असल्याचे सांगून सायबर ठगांनी कारवाईची भीती दाखवली होती. मनी लॉड्रिंगसह तसेच इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये तिच्या सहभाग उघडकीस आला असून तिची चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई होईल असे सांगून तिला डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगितले.


फोनवरील या धमकीने महिला घाबरून केली. घराबाहेर जाता येणार नाही, कोणाशी संपर्क साधता येणार नाही असे सांगून नियमांचे उल्लघंन केल्यास घरातून अटक करण्याची धमकी या दोन भामट्यांनी तिला दिली होती. त्यानंतर तिच्या बँक खात्याची माहिती तिच्याकडून घेतली आणि विविध बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्याची जबरदस्ती केली. अटकेच्या भीतीने तिने या ठकसेनांना सव्वाकोटी रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आला.


सायबर सेल पोलिसांनी तक्रा दाखल झाल्यानंतर तोतयागिरी करुन फसवणुक करणे, आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. तांत्रिक माहितीवरुन या पथकाने जळगावमधून रोहित सोनार आणि हितेश पाटील यांना ताब्यात घेतले. तपासात काही रक्कम रोहितच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले. या खात्याची माहिती हितेश पाटीलने विदेशात वास्तव्यास असलेल्या सायबर ठगांना दिली होती. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर या दोघांनाही ठराविक रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर दोघांनाही चौकशीसाठी मुंबईत आणले. वांद्रे न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या