Ticker

6/recent/ticker-posts

गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई, (दादासाहेब येधे) : पांढऱ्या रंगाच्या वेगनआर कारमधून होत असलेली गांजाची तस्करी वडाळा टीटी पोलिसांनी रंगेहाथ पकडली. पोलिसांनी दोघा तस्करांना पकडून तब्बल ५१ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला.

वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना एक वेगनआर कार (एमएच-०१-ईई-३०१३) संशयास्पदरीत्या जाताना दिसली. त्यामुळे पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा केला. परंतु चालकाने कार थांबविण्याऐवजी पुढे नेली. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून कारला थांबवले. त्यानंतर कारमधील अबुबकर शान आणि शहबाज खान यांच्याकडे विचारणा करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे कारची झडती घेतली असता तब्बल ५१ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा मिळून आला. पोलिसांनी दोघा गांजा तस्करांना बेडय़ा ठोकल्या असून त्यांनी हा गांजा कोठून आणला व तो गांजा ते कोणाला विकणार होते याचा तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या