वांगणी गावामध्ये जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वितरण - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, १७ जून, २०२४

वांगणी गावामध्ये जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वितरण

देशाच्या प्रगतीचा मार्ग शिक्षण क्षेत्रातूनच जातो ! - सत्यवान नर


ठाणे, १७ : देशाच्या प्रगतीचा मार्ग शिक्षण क्षेत्रातूनच जातो. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उच्च असणे आवश्यक आहे.  मुलांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून  आम्ही या दिशेने नेहमीच सकारात्मक प्रयत्न केले आहेत असे प्रतिपादन जीवन प्रबोधिनी ट्रस्ट चे संस्थापक, अध्यक्ष सत्यवान नर यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील वांगणी या छोट्याशा गावातील प्राथमिक शाळेमध्ये जीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सत्यवान नर बोलत होते.


नर पुढे म्हणाले, जीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून आम्ही मागील १५ वर्षांपेक्षा जास्त काळ समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये रचनात्मक व विधायक स्वरुपाचे कार्य करित आहोत. आरोग्य, कला, संस्कृती, ग्रामविकास आदी विषयांमध्ये मोठं कार्य जीवन प्रबोधिनीने उभं केलं. कोरोना काळात तर जीवाची पर्वा न करता जीवन प्रबोधिनीचे स्वयंसेवक समाजासाठी कार्य करत होते. दुष्काळग्रस्त भागांमध्य टॅंकरने पाणी पुरवठा करुन नागरिकांना दिलासा देण्याचे काम देखील जीवन प्रबोधिनीने केलेले आहे.


मात्र, शिक्षण हा विषय नेहमीच जीवन प्रबोधिनीच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे-जे समाजसुधारक जन्माला आले, त्यांच्या समाजकार्याच्या केंद्रस्थानी शिक्षण हाच विषय राहिला. महात्मा ज्योतिबा फूले, सावित्रीबाई फूले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या समाजधुरिणांनी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं. 


जीवन प्रबोधिनी यापुढील काळात देखील अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून समाजात विद्यार्थ्यांच्या भविष्यनिर्माणा मध्य महत्त्वाची भूमिका बजावत राहिल, असा निर्धार सत्यवान नर यांनी व्यक्त केला.शेवट शाळेतील आवारात झाडे लाऊन कार्यक्रमाची सांगता केली.


सोबत संस्थेचे अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस, हेमंत मकवाना, खजिनदार गणेश शिरसागर, संयोजक  गणेश पार्टे, शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज