मुंबई, दि. २६ : मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास अंधेरी पूर्वेकडील महाकाली रोड आणि गुरुनानक रोड येथील रामबाग सोसायटी या सात मजली इमारती नजीक दरड कोसळून इमारतीला मोठा धोका पोहोचला. मातीचा खच इमारतीच्या पहिल्या मजऱ्यावरील फ्लॅटमध्ये शिरला. इमारतीतील ११ घरांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेनंतर इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक आणि श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भीमेश मोतुला यांनी दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा