मुंबई, दादासाहेब येंधे : एकट्यानेच चोरी, घरफोडी करुन एकही पुरावा मागे न सोडणाऱ्या एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला वरळी पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद आफताब कासीम खान उर्फ मौसीन इम्रान सय्यद उर्फ शेख (२२) असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळून चोरीचा ७५० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. वरळी पोलीस ठाण्याचे पथक गुरुवारी रात्री जीजामाता नगर येथे वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत असताना विना नंबरप्लेट, विना हेल्मेट अँक्टीवा घेऊन जात असलेल्या मोहम्मदला पोलिसांनी अडवले.
पोलिसांनी त्याच्याजजळ वाहन चालकाचा परवाना, वाहनाची कागदपत्रे यांची मागणी करत वाहनाला नंबर प्लेट का नाही? अशी विचारणा केली. त्यावर तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सखोल चौकशीअंती मूळचा उत्तरप्रदेशमधील रहिवासी असलेला शेख हा सुरतमध्ये वास्तव्यास असून तो एक आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर भरूच येथील सी डिव्हिजन पोलीस ठाणे, बडोदा येथे अनेक गुन्हे असल्याचे समोर आले.
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा