Ticker

6/recent/ticker-posts

बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये विक्री

२४/१/२०२३

मुंबई, दादासाहेब येंधे : कॉलेजसाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत एक लाखात राजस्थानमधील व्यक्तीसोबत औरंगाबाद येथे तिचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार पार्कसाईट पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आला आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी मुलीसोबत लग्न करणाऱ्या व्यक्तींसह तिची विक्री करणाऱ्या चौकडीला अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ डिसेंबर रोजी कॉलेज साठी घराबाहेर पडलेली १७ वर्षे मुलगी घरी परतलीच नाही म्हणून कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. हरवलेल्या मुलीचा मोबाईल बंद आल्याने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. २३ डिसेंबर रोजी मुलगी दादर रेल्वे स्टेशन येथे पुरुष व महिलेसह दादर हुबळी एक्सप्रेस मध्ये चढताना दिसली. पोलिसांनी हाच धागा पकडत तपास सुरू केला असता त्या जोडप्याने मिरजचे तिकीट काढल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तात्काळ मिरज रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. २४ डिसेंबर रोजी मुलगी दोघांसोबत दुचाकीवरून जाताना दिसली. दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी तपास सुरू केल्या दुसाकी संबंधित व्यक्तीने दादर रेल्वे स्टेशन येथून लगेच द्वारे मिरजला नेल्याचे उघड झाले दादर रेल्वे स्टेशन येथून लगेचद्वारे पाठवलेल्या मोटरसायकल बाबत सविस्तर माहिती मिळतात संबंधित व्यक्ती आणि त्याच्या सोबतची महिला २२ तारखेला चेंबूर येथे तिच्या पतीला भेटण्यासाठी आल्याचे उघड झाले.


१६ जानेवारी रोजी पोलीस पथक तिच्या पतीपर्यंत पोहोचले. त्याच्याकडून मुलीसोबत असणारी महिला त्याची पत्नी सुनीता उर्फ सुधा मनोज जोशी (वय, २४) पत्नीचा मामा लडप्पा लक्ष्मण गोवी (वय, ३४) तसेच गणपती हरिश्चंद्र कांबळे असल्याचे सांगितले. ते मूळचे कर्नाटकच्या हिरापूरचे रहिवाशी आहेत. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करीत मुलीची सुटका केली आहे. पार्क साईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर, तपास अधिकारी प्रमोद सानप, विकास पाटील पोऊनि हुजरे, पो.ना. अजित पाटील, पोशि. गावडे, मपोशि रुपाली हाडवळे यांनी हरवलेल्या मुलीबाबत काहीही सुगावा नसताना कौशल्यपूर्ण तपास करून कारवाई केली आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या