Ticker

6/recent/ticker-posts

किरकोळ वादातून हत्या

मुंबई : शनिवारी माहीम परिसरात एका २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती, त्याच्या शरीरावर धारदार वस्तूने केलेल्या अनेक जखमा असल्याने माहीम पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आणि एका भंगारवाल्याला ४८ तासात अटक केली आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे असून अधिक तपास सुरू आहे.


याप्रकरणी शुक्रवारी पहाटे एमएमसी रोडवर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याची माहिती माहीम पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरने त्याला तपासात मृत घोषित केले. माहीम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण शाहू नगरचा राहणारा असून गणेश उर्फ आकाश संजय भालेराव असे त्याचे नाव आहे, त्याला नशेची सवय होती. याप्रकरणी माहीम पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक््तीविरुद्ध गुन्हा दाखल करत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल ढोले, सहायक पोलिस निरीक्षक अतुल आव्हाड, उपनिरीक्षक मच्छिंद्र सानप आणि पथकाने माहीम, शिवाजी पार्क, धारावी, दादर येथील १३६ सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले.


५७ जणांची चोकशी 


या परिसरातील भंगारवाले आणि इतर जणांची चौकशी केली. दरम्यान, फुटेजमध्ये मयताच्या आसपास एक भंगारवाला संशयीतपणे वावरताना दिसला, ज्याला दादर पशचिमच्या शिवाजी मंदिर बसस्टॉपकडून ताब्यात घेण्यात आले, तेव्हा किरकोळ कारणावरून त्याने ही हत्या केल्याची दिली, या गून्ह्याबाबत कोणतेही धागेदोरे हातात नसताना निव्वळ तांत्रिक तपास आणि मानवी कौशल्याने माहीम पोलिसांनी खुनाच्या गु्॒ह्याची उकल केली.




Press note




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या