Ticker

6/recent/ticker-posts

दारू पिताना मित्र बनला, काचेच्या बाटलीने गळा चिरला

मुंबई, दादासाहेब येंधे : दारू पिताना दोघांची ओळख झाली. दोघे एकमेकांचे मित्र झाले. दारू पिऊन घराच्या दिशेने जात असतानाच दोघांमध्ये शुल्लक कारणावरून भांडण झाले आणि दारूच्या नशेतच एकाने फुटलेली काच दुसऱ्याच्या गळ्यावर भोसकली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपीने उत्तराखंडला जाण्याची तयारी सुरू केली. पण, गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने त्याच्या डोंबिवलीतच मुस्क्या आवळल्या.


राकेश पुष्कर सिंग डोभाल (वय, २०) हा आणि मृत तरुण शाहूनगर येथे २७ नोव्हेंम्बर रोजी  रात्री एकत्र दारू प्यायले तेथेच दोघांची ओळख झाली. मग दारूच्या नशेत रात्री उशिरा दोघेही एकत्र जात असताना त्यांच्या वाद झाला. चालता चालता शाहूनगर येथील थंगमनन मंदिरासमोरच्या गल्लीत दोघे आले असता राकेशने त्याला एका आडोशाला ओढले व  तेथे पडलेल्या फुटलेल्या बाटलीच्या काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केले. मग तो काचेचा तुकडा त्याच्या गळ्यात खूपसला. यामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्यांचा राकेशने तेथून पळ काढला. याप्रकरणी शाहूनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर युनिट-५ चे प्रभारी निरीक्षक घनश्याम नायर,  निरीक्षक अजित गोंधळी, एपीआय अमोल माळी व पथकाने समांतर तपास सुरू केला. आरोपीचे नाव राकेश डोभाल असून तो उत्तराखंडचा आहे. तसेच गुन्हा केल्यानंतर तो उत्तराखंडला पळून जाण्याचा प्रयत्न  करत असल्याची माहिती युनिट-५ ला मिळाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने माग काढत राकेश सध्या डोंबिवलीतच असल्याने पोलीस पथकाने डोंबिवलीत जाऊन राकेशला गुन्हा घडल्यापासून ४८ तासांच्या आत पकडले. राकेश हा शाहूनगर परिसरात एका टेलरकडे कपडे कटिंगचे काम करत होता, असे तपासात समोर आले आहे. 




Press note



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या