Ticker

6/recent/ticker-posts

विनयभंग करणाऱ्या डिलव्हरी बॉयला अटक

 दोन तासांत गुन्हेगाराला अटक

दि.५/१२/२०२२


मुंबई, दादासाहेब येंधे :  १ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी १७.१० वाजता खार, पश्चिम येथे राहणाऱ्या तक्रारदार महिला यांनी खार पोलीस ठाण्यास जाऊन माहिती दिली की, दिनांक ३०/११/२०२२ रोजी दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी घरातून त्यांच्या मोबाईलवरून झेप्टो अँपवरून भाजीपाला ऑर्डर केला होता. त्यानुसार आरोपी हा साधारण १५.१५ वाजता मागविलेल्या भाजीपाल्याची डिलीव्हरी देण्याकरीता घरी आला होता. 


त्यावेळी पिडीत महिला हया एकटयाच घरी होत्या. त्यावेळी पिडीत महिला हया डेलीव्हरी देण्याकरीता आलेल्या इसमाकडून भाजीपाला घेत असताना तो त्याच्या मोबाईलमध्ये शुटींग करीत होता. त्यास त्याबाबत त्यांनी विचारले असता तो हसत होता आणि त्यामुळे पिडीत महिला हया घाबरून घरात गेल्या. त्यानंतर सदर इसम तक्रारदार महिलेच्या घरात घुसला व त्याने त्या महिलेचा हात पकडला व त्यांच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच त्यांनी त्यास घराच्या बाहेर जाण्यास सांगितले. परंतू तो जात नव्हता. त्यावेळी त्यांनी वॉचमनला बोलावून वॉचमनच्या मदतीने त्याला घराच्या बाहेर काढले व त्यावेळी त्यांच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न झाली म्हणून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून खार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्र. १३१५/२२ कलम ३५४, ३४१ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्हयामधील फिर्यादी हया पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्याकरीता आल्या तेव्हा लागलीच आरोपी शहजादे शेख (वय ४३ वर्षे) याची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले, तपासाची चक्रे फिरायला लागली. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासांच्या आत त्यास गुन्हयामध्ये अटक करण्यात आली. पोलीस त्या आरोपीकडे गुन्हयाच्या अनुषंगाने पुढील तपास करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या