मुंबई, दि. १ : राज्य सरकारच्या कामा रुग्णालयात देखील स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाला सुरुवात झाली आहे. जे. जे. रुग्णालयातील हिरकणी कक्षाला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर शासकीय रुग्णालयातील हा दुसरा कक्ष आहे. या हिरकणी कक्षामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांसाठी हा कक्ष निश्चितच वरदान ठरणार आहे.
चाइल्ड हेल्प फाउंडेशन, अल्केम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामा रुग्णालयात मंगळवारी या हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जे जे रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी सांगितले की, महिलांसाठी नेहमीच सुरक्षित वातावरणाची गरज भासली आहे, जिथे त्यांना सुलभ सुविधांसह सक्षम वाटेल. महिलांना त्यांच्या बाळांना स्तनपान देताना असुरक्षित वाटू नये यासाठी हा कक्ष सुरू करण्यात आला आहे असे त्या म्हणाल्या.

0 टिप्पण्या