Ticker

6/recent/ticker-posts

परदेशी महिलेचे सामान चोरणाऱ्या महिलेचा अटक

 लोहमार्ग पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

दि. २९/११/२०२२

मुंबई, दादासाहेब येंधे : परदेसी महिलेचे सामान चोरून पळून गेलेल्या महिलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. राधा सेठी असे तिचे नाव असून तिच्याकडून चोरीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. राधा सेठी ही सराईत गुन्हेगार असून तिच्या विरोधात दादर लोहमार्ग पोलीस ठाण्यात देखील गुन्हा नोंद आहे.


रॅचेल ओमेसबी  या न्यूझीलंड येथे राहतात. त्या बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आल्या. त्यांच्या गाडीला वेळ असल्याने त्यांनी जनरल हॉलमधील लॉकरमध्ये त्यांचे सामान ठेवले. गाडीची वेळ झाल्यावर त्या लॉकरमधून साहित्य काढण्यासाठी गेल्या तेव्हा सॅमसंग मोबाईल, मॅकबुक, सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बॅगचोरी प्रकरणी रॅचेल ओमेसबी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली.


नमुद गुन्हयाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मेहबूब इनामदार यांनी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी श्री सांगळे व स्टाफ यांना तपासाबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पोनि श्री सांगळे व स्टाफ यांनी लागलीच सीएसएमटी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यांना एक संशयीत महिला बॅग उचलून घेवून जात असल्याची दिसून आली. प्राप्त फुटेजवरून सदर संशयीत महिलेचे सीएसएमटी रेल्वे स्थानकातील संपुर्ण फुटेजची तपासणी केली असता ती महिला ही सीएसएमटी रेल्वे स्थानकातून बांद्रा लोकल पकडून जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार लागलीच रेल्वे सुरक्षा बल यांचेसह पथके तयार करून वडाळा व बांद्रा येथे रवाना करण्यात आली. बांद्रा रेल्वे स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता नमुद महिला ही बांद्रा रेल्वे टर्मिनसच्या दिशेने जात असताना दिसून आली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी बांद्रा रेल्वे टर्मिनस येथे जावून तेथील ऑन डयुटी कर्मचारी यांना नमुद महिलेचा फोटो दाखवून तपास केला असता पार्सल गेटचे रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी यांनी आरोपी महिलेस बांद्रा रेल्वे टर्मिनस येथे पाहिले असल्याचे सांगितले. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार यांनी बांद्रा रेल्वे टर्मिनस परिसरात शोध घेण्यास सुरू केले परंतू नमुद महिला ही मिळून आली नाही. त्यानंतर बांद्रा रेल्वे टर्मिनस येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपी महिला ही बांद्रा-अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचे इंजिन बाजूकडील जनरल डब्यामध्ये चढत असताना दिसून आली. सदर गाडी ही बांद्रा रेल्वे टर्मिनस येथून रवाना झाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी सांगळे यांनी बोरीवली रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांना तात्काळ संपर्क साधून सदर गुन्हयाबाबत व आरोपीबाबत माहिती देवून महिला आरोपीचा शोध घेणेबाबात विनंती केली असता वपोनि श्री अनिल कदम यांनी त्यांच्या स्टाफला सुचना देवून बांद्रा-अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचे इंजिन बाजूकडील जनरल डबा चेक केला असता आरोपी महिला ही चोरी केलेल्या बॅगेसह मिळून आली असता तिला ताब्यात घेतले व सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे घेवून आले.


सदरची कामगिरी एम. ए. इनामदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार पोउनि ए. बी. सांगळे, पोहवा/०४ पी. एस. चव्हाण, पोना/२२४९, एस. आर. आव्हाड, पोशि/६०२, काकड, पोशि/४४४ रेवगडे, मपोहवा/२५२५ बी. एस. नेमळेकर, मपोहवा/१०६९ एस. पी. चिकणे तसेच रेल्वे सुरक्षा बल, सीएसएमटी मेन लाईन रेल्वे स्टेशनकडील एकनाथ गडदे, आरक्षक मनोज गुज्जर, कृष्णकुमार, अमोल नारनवरे तसेच बोरीवली रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम व स्टाफ यांनी केलेली आहे.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या