मुंबई, दि.१८ : बेस्ट बसमधील गर्दीचा फायदा घेऊन हातचलाखीने प्रवाशांचे मोबाईल तसेच पर्समधील किमती ऐवज चोरणारी टोळी गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने गजाआड केली.
आठवड्यातून तीन ते चार दिवस ही टोळी बेस्ट बसमध्ये हातसफाई करत असल्याचे समोर आले आहे. बेस्ट बसमध्ये हातचलाखी करून प्रवाशांचे मोबाईल फोन व पर्स कटिंग करून चोरी करणारा एक सराईत चोरटा कल्याणच्या खडेगोळवली गावात ओळख लपवून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने खडेगोळवली गाव गाठून त्या चोराला पकडून आणले. त्याच्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने त्याला पुढील कारवाईसाठी वरळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, त्या चोराने दिलेल्या माहितीच्या आधारे प्रभारी निरीक्षक इंद्रजित मोरे, एपीआय अजय बिराजदार तसेच शरद शिंदे, ज्ञानेश्वर मिंडे, विजय लहाणे, नानाभाऊ रोटे, प्रवीण चौरे, सुशील साळुंखे या पथकाने गेल्या दोन दिवसांपासून शीव येथील राणी लक्ष्मीबाई चौक येथील बेस्ट बस थांब्यावर सापळा लावून पोलिसांनी मुंब्रा येथे राहणारे हजरत शौकत शेख ऊर्फ अज्जू बचकाना आणि कलीम रशीद शेख या दोघांना अटक केली.
Press Note

0 टिप्पण्या