सीबी कंट्रोलची धडाकेबाज कामगिरी
मुंबई, दादासाहेब येंधे : विद्यार्थ्यांना आपल्या मोहात फसवत अत्यंत घातक अशा ई- सिगारेटच्या खरेदी विक्रीचा बाजार आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल युनिटने नुकताच उध्वस्त केला. तरुणांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना विकण्यासाठी आणलेल्या हजारो ई-सिगरेटचा धूर या ई सिगारेट पेटवण्याआधीच त्या विझवून टाकल्या आहेत. आग्रीपाडा परिसरात पथकाने धडक कारवाई करत तब्बल ५८ लाख ५० हजार किमतीचा ५५०० साठा जप्त केला.
ई-सिगारेटला माचीस किंवा लाइटरची गरज भासत नाही. दम मारल्यानंतर तोंडाला त्याचा उग्र वासही येत नाही, पाहिजे तेव्हा दम मारून बंद करून ठेवता येतो. तसेच वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये या उपलब्ध असल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेटची मागणी वाढू लागली आहे. सीबी कंट्रोलने त्याची गंभीर दखल घेऊन केलेल्या कारवाईड एका टेम्पोतून ३४ लाख ५० हजार आणि सिगारेटची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून २४ लाख रुपये किमतीचा ई-सिगारेटचा साठा जप्त केला आहे.

0 टिप्पण्या