Ticker

6/recent/ticker-posts

ड्रग्स तस्कराला५३ लाखांच्या एमडीसह अटक

मुंबई, दादासाहेब येंधे  : एमडी ड्रग्सची खरेदी-विक्री करणाऱ्या डोंगरीतल्या एका सराईत ड्रग्स तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथकाने आग्रीपाडा येथे ५३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या २६७ ग्रॅम वजनाच्या एमडीसह पकडले.

आग्रीपाडा येथील इकबाल दूधवाला मार्गावर डोंगरीत राहणारा ड्रग्स तस्कर एमडीचा साठा घेऊन येण्यात असल्याची माहिती वरळी युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष साळुंखे, अमोल कदम, उपनिरीक्षक रवींद्र सावंत व पथकाने अल अबा अपार्टमेंट आणि अल हाश्मी इमारतीमध्ये सापळा लावला. तो ड्रगस तस्कर तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याची अंगझडती घेतली असा त्याच्याजवळ २६७ ग्रॅम एमडीचा साठा मिळून आला. त्याला अटक करून न्यायालयात सादर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्या तस्कराविरुद्ध याआधी सुद्धा एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. त्यांनी हा एमडी कोणाकडून आणला याचा पोलीस तपास करीत आहेत.









Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या