Ticker

6/recent/ticker-posts

तूर्त फक्त समज! नंतर पोलिसांकडून कारवाई

११ नोव्हेंबर पासून सीटबेल्टसाठी कडक कारवाई


मुंबई, दि. ४ : सीटबेल्टचा वापर कटाक्षाने व्हावा यासाठी वाहतूक पोलिसांकडून १० दिवस जनजागृती करण्यात येणार आहे. जाणीवपूर्वक विनासीटबेल्ट प्रवास करताना सापडेल त्याला सीटबेल्टचा वापर करण्यासाठी पोलीस त्यांच्या पद्धतीने समज देणार आहेत. त्यानंतर मात्र ११ तारखेपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होईल. ज्या चारचाकी वाहनांमध्ये (टॅक्सी /खाजगी) मागील बाजूस, मधील आसनाकरिता कंपनीमार्फत सीटबेल्टची व्यवस्था करण्यात आलेली नाही अशा वाहनातल्या मधील आसनावरील प्रवाशांवर ई-चलन कारवाई करण्यात येणार नाही. ज्या प्रवासी टॅक्सी मध्ये सीटबेल्टची व्यवस्था आहे; परंतु प्रवासी त्याचा वापर करीत नसतील तर अशावेळी चालकावर कारवाई न करता प्रवाशांवर ही चलन कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.


बांद्रा वाहतूक पोलीस कारचालकांना सीटबेल्टविषयी समज देताना





पोलीस पत्रक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या