Ticker

6/recent/ticker-posts

वडाळ्यात ८५ लाखांचा चरस साठा जप्त

गोवंडीतल्या चालकाला घेतले ताब्यात 


मुंबई, दादासाहेब येंधे : कुणालाही काही समजणार नाही अशा आविर्भावात असणारा गोवंडीत राहणारा एक तरुण दुचाकीवरून चरसचा साठा घेऊन जात होता. पण, आधीच याबाबतची खबर मिळालेली असल्याने वडाळा पोलिसांनी त्याला पकडून तब्बल ८५ लाख किमतीचा १७ किलो चरसचा साठा नुकताच जप्त केला. 




सोमवारी रात्री गोवंडीत राहणारा एक तरुण दक्षिण मुंबईतून चरसचा साठा घेऊन गोवंडीच्या दिशेने जाणार असल्याचे खबर वडाळा पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक मिलिंद जाधव, निरीक्षक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद खाटमोडे तसेच सागर पवार, राजकुमार बिळासकर, इंद्रजीत साळवे, सिद्ध काटे, अरुण डोळस या पथकाने दिनबंधू नगर परिसरात सापळा लावला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तो तरुण दुचाकीवरून येताना दिसताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्यावेळी त्याच्याकडे १७ किलोचा चरसचा साठा सापडला. जाहीद टिपू सुलतान खान (वय, २८) असे त्या तरुणाचे नाव असून तो ड्रायव्हरचे काम करतो. डोंगरीत राहणाऱ्या जाहिद याने चरसचा साठा नेमका कुठून आणला, तसेच तो कुठे नेणार होता व कोणाला विकणार होता याचा तपास वडाळा पोलीस करत आहेत.





Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या