मुंबई, दि. ३०: फ्रेंड्स ऑफ दाभोलकर तर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कसोटी विवेकाची प्रदर्शनाच्या आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात नरेंद्र दाभोळकर यांचे जीवन विचार आणि कार्य दाखवणाऱ्या कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. जे. जे. कला महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी या कलाकृती साकारल्या होत्या.
धर्माच्या नावाखाली अवैज्ञानिक आणि अतार्किक गोष्टी मोठ्या विश्वासाने पसरवण्याचे काम काही वेळा धर्मगुरूंकडे होत असते हे मी स्वतः अनुभवले आहे. अशा अंधविश्वासाच्या अंधाराबरोबरच लढण्यासाठी सत्याचा विजय विचार प्रखरपणे समाजात रुजवला पाहिजे. खरे बोलण्याचा गुन्हा केलेले प्राध्यापक, कार्यकर्ते, विचारवंत कधीपर्यंत तुरुंगात राहतील माहिती नाही. हे अंधविश्वासाचे राज्य फक्त आपल्या देशात आहे असे नव्हे इराणमध्येही हजारो मुली हिजाबच्या विरोधात जीव धोक्यात घालून रस्त्यावर लढत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

0 टिप्पण्या