मुंबई, दि. २९ : बोरवली पश्चिमेतील वझिरा नाक्यावरील एक धोकादायक इमारत शुक्रवारी दुपारी पाडण्याचे काम सुरू असताना त्यातील काही भाग अचानक कोसळला. इमारत धोकादायक म्हणून जाहीर केल्याने ती आधीच रिक्त करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, हा भाग शेजारच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर पडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.
कमला रेसिडेन्सी नावाची ही चार मजली इमारत धोकादायक असल्याने खाली करण्यात आली होती. याजागी नवीन इमारत उभारली जाणार असल्याने ती पाडण्याचे काम सुरू होते. पाडकाम सुरू असताना दुपारी १ च्या सुमारास त्यातील काही भाग कोसळला. यामुळे रस्त्यावर उभे असलेल्या चार ते पाच गाड्यांचे मोठे नुकसान झाले.


0 टिप्पण्या