Ticker

6/recent/ticker-posts

"आप" युवा आघाडी तर्फे खड्ड्यांचे श्राद्ध घालून निषेध आंदोलन

मुंबईतील रस्त्याच्या खड्ड्यांना वाली कोण...!


मुंबई, दि. २५ : शहरातील रस्त्यांवरून फिरताना क्षणाक्षणाला मोठ्या खड्ड्यांची प्रचिती येतेच पण ठीकठिकाणी खड्डेच नव्हे तर रस्त्यात डबके तयार झाले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिकेच्या दुर्लक्षामुळे अशी वेळ आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी डोम कावळ्यांन रुपी असलेल्या अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी मुंबईतील खड्यांच्या "मोक्ष" प्राप्तीसाठी श्रद्धा घालण्यात आले असल्याचे आप युवा आघाडी मुंबई कार्यकारी अध्यक्ष आदित्य मांजरेकर यांनी सांगितले. 

 


आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा- मेनन यांच्या नेतत्त्वाखाली मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्यांचा विरोध करण्याकरीता आप युवा आघाडी तर्फे खड्ड्यांमध्ये बसुन पूजा करून त्याचे श्राद्ध घालण्यात आले. मोठ्या संख्येने युवा आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी व शासनाविरोधात घोषणाबाजी करून बांद्रा स्टेशन परिसर दणाणून सोडला. 


मुंबईतील रस्त्याच्या खड्ड्यांना वाली कोण...!  खड्ड्यांमध्ये पावसाळ्याचे पाणी मोठया प्रमाणावर साचत असून, वाहन चालकांना वाहनचालवितांना या वेळी या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने या ठीकाणी मोठा अपघात होवुन जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असावेळी दुर्दैवाने एखाद्याचा यात नाहक निरपराध व्याक्तीचा बळी जात असेल तर शासनाच्या अशा गलथान कारभाराचा आम्ही निषेध करतो. पालिकेसह नगरसेवकांचे उदासीन धोरण याला कारणीभूत ठरत असल्याने आता नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता लोकप्रतिनिधी काय करत आहेत? असा खोचक सवाल आदित्य मांजरेकर यांनी उपस्थित केला. 


मुंबई महपालिकेत अनेक वर्ष सत्तेत असलेला पक्ष रस्ते होणार या आश्वासनांवर वर्षानुवर्षे नागरिकांना मूर्ख बनवत आहे. आता रस्त्याची वाट लागली असून नागरिकांचे हाल सुरु आहे. पालिकेचे दुर्लक्ष होत असून डबके साचले तरी लोकप्रतिनिधी उपाययोजना करत नसून गोड बोलून वेळ मारून नेत आहेत. पण या नेत्यांना आणि मुंबई महानगपालिकेतील डोम कावळ्याचे रूप धारण करणाऱ्या  अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आता खड्ड्यांच्या मोक्ष प्राप्ती करिता श्राद्ध घातलं आहे, पण  झोपल्याचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जर जाग आली नाही तर तीव्र आंदोलन करून असा, इशारा आप युवा आघाडी मुंबई प्रभारी विकास कोळी यांनी दिला.



Photo : viral

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या