Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल चोरास रंगेहात पकडले

सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांची उत्तम कामगिरी


मुंबई, दि. २४ : लोकल रिकामी आहे आणि दरवाजा जवळील सीटवर निवांत बसून मोबाईल पाहण्याची सवय असलेल्या प्रवाशांना आता सावध राहणे गरजेचे आहे. लोकलमधील चोरांनी आता मोबाईल चोरी करण्यासाठी दरवाजा जवळील आसनावर बसून प्रवास करणाऱ्या देशावर प्रवाशांना टार्गेट केले आहे. सीएसएमटी स्थानकातून निघालेल्या लोकलमधील दरवाजाजवळील आसनावर बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.




सीएसएमटी वरून कुर्ला येथे जाण्यासाठी २२ वर्षीय राहुल हक सिराजुल हक अन्सारीने धीमी लोकल पकडली. दरवाजाजवळील सीटवर बसताच तो मोबाईलवर चित्रपट पाहायला लागला. लोकल मशीद स्थानकातून सुटत असताना चोराने त्याच्या हातातून मोबाईल खेचला. मात्र, सुटलेल्या गाडीने लगेचच वेग पकडल्याने चोर प्लॅटफॉर्मवर पडला. त्याचवेळी तक्रारदार याने चोर चोर असा आरडाओरडा करता स्थानकत गस्त घालत असलेल्या रेल्वे पोलीस अंमलदाराने त्याला तात्काळ ताब्यात घेतले.



सीएसएमटी पोलीस ठाणेत त्याची चौकशी करण्यात आली असता संतोष वीरेंद्र गुरव असे नाव असलेल्या या मोबाईल चोराच्या नावावर शहर हद्दीत १०७ गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. गुरव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आल्याचे सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांनी सांगितले.


प्रवाशांनी नेहमी सावध राहून प्रवास करावा तसेच आपला मोबाईल, मौल्यवान वस्तू यांची काळजी घ्यावी. काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ स्थानकावरील पोलिसांशी संपर्क करावा असा महत्वाचा संदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या