मुंबई, दि.२ : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, शेलार यांनी गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भेट घेतली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असतानाच आपण केवळ गणपती दर्शन साठी आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.


0 टिप्पण्या