मुंबई : फेसबुकवर बनावट नावाने अकाऊंट उघडून फसवणूक करणाऱ्याला सुशांत तळाशीलकर याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
बोरवली पूर्वेच्या राजेंद्र नगर येथे सुरेश शर्मा राहतात. मे महिन्यात त्यांच्या परिचयाच्या एका महिलेची त्यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती स्वीकारल्यानंतर त्यांना फेसबुक मेसेंजरवर काही मेसेज आले. सुशांतने त्यांना काही अश्लील मेसेज पाठवले. त्यानंतर सुशांतने त्या मेसेजचे स्क्रीनशॉट शर्मांना पाठवले. जर दहा हजार रुपये दिले नाही तर ते मेसेज सोसायटीच्या ग्रुपवर व्हायरल करू अशी धमकी दिली. त्याचदरम्यान एका महिलेला तिच्या नावाने बनावट फेसबुकवर अकाऊंट उघडल्याचे समजले. या घटनेनंतर सुशांतने शर्मा आणि महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने आणि शर्माने कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात धाव घेतली. शर्माच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.फेसबुकवर बनावट नावाने अकाऊंट उघडून फसवणूक करणाऱ्याला सुशांत तळाशीलकर याला अटक केली.

0 टिप्पण्या