देशी बनावटीची ४ अम्निशस्त्रे जप्त
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर घटकातील पोहवा/ ३१८४ राजेंद्र घोळप व पोलीस मुख्यालय, ठाणे शहर नेमणुकीतील सपोउनि/अंकुश भोसले व पोहवा/५३८९ दत्ता भोसले, यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत ठाणे आयुक्तालयाचे हददीत सिडको बस स्टॉप येथे १) तालीब सदाकत अली अन्सारी, वय २० वर्षे, राह. जि. बदार्यु, राज्य उत्तर प्रदेश, २) इम्रान मो. इरफान अन्सारी, वय १९ वर्षे, राह. जि. बदार्यु, राज्य उत्तर प्रदेश हे गावठी कट्टे व काडतुसे घेवुन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर घटकातील वपोनि/अनिल होनराव यांना दिल्याने त्यांचे मागदर्शनाखाली सपोनि/महेश जाधव व पोलीस पथक यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन दोन आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन २ गावठी कटटे, ६ जिवंत काडतुसे व इतर साहित्य कारवाई करून जप्त केले.
त्यावरून अटक केलेले आरोपी यांनी बेकायदेशीर कृत्य करण्याच्या उद्देशाने मनाई आदेशाचे उल्लंघन करून आपल्या कब्जात विनापरवाना अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे विक्री करण्याच्या उददेशाने बाळगल्याने त्यांच्या विरूध्द 'ठाणेनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ९७/२०२२ भा.ह.का.कलम ३,२५ सह म.पो.का.कलम ३७९), १३५ प्रमाणे दि. ३०/०५/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद दोन्ही आरोपींची दिनांक ०६/०६/२०२२ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपीने दिलेल्या माहितीवरून इसम नामे अन्सार मो. अजीज सलमानी, वय १९ वर्षे, राह. जि. बाराबंकी, राज्य उत्तर प्रदेश यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन २ गावठी कट्टे व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सदर नमुद आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर करून त्याची देखील दि. ०६/०६/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे.
अशा प्रकारे सदर गुन्हयात वर नमुद तीन इसमांना अटक करण्यात आली असुन देशी बनावटीची ४ अमनशस्त्रे, ८ जिवंत काडतुसे व इतर साहित्य असा एकुण ५५,१६०/- रू. किं चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. वर नमुद इसमांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. ०६/०६/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास सपोनि/महेश जाधव, नेम. मालमत्ता गुन्हे शाखा, ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, जय जीत सिंह, मा. सह आयुक्त दत्तात्रय कराळे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोरळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अशोक राजपुत (शोध -२) यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनिरी/अनिल होनराव, १) सपोनि/महेश जाधव २) सपोउपनिरी/ स्वपील प्रधान ३) पोहवा/ ३१८७ घोलप ४) पोहवा/ २२७४ करळे ५) पोहवा/ २९२८ जाधव ६) पोहवा/ ५७७२ शिंदे ७) पोहवा/११९७ शिंदे, ८) पोना/ ३३७४ भामरे, ९) पोना/ ६५६७ भुके तसेच पोलीस मुख्यालय, ठाणे शहर नेमणुकीतील १०) सपोउपनिरी/अंकुश भोसले, ११) पोहवा/ ५३८९ दत्ता भोसले या पथकाने केलेली आहे.
Press Note

0 टिप्पण्या