मुंबई : बेस्ट उपक्रमाने 'चलो ॲप'च्या सहाय्याने प्रवाशांना तिकीट काढण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता या सुविधेचा विस्तार करत विज बिल भरण्याचाही पर्याय बुधवारपासून उपलब्ध करून दिला आहे. त्याचा फायदा बेस्टच्या १० लाख ग्राहकांना होणार आहे. उपक्रमाने चलो ॲपच्या मदतीने तिकीट प्रणाली अधिक सोपी सुटसुटीत केली.
बेस्टच्या प्रवासात अनेकदा सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी, भांडणे टाळण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल होते. सध्या दोन लाखांहून अधिक मुंबईकरांनी चलो ॲप कार्ड खरेदी केले आहे. त्यानंतर वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे. ग्राहकांनी चलो ॲपच्या मेनू बारवर जाऊन बिलाचा पर्याय निवडून त्यानंतर वीजग्राहक क्रमांकाची नोंद केल्यानंतर बिल भरता येईल.
0 टिप्पण्या