Ticker

6/recent/ticker-posts

गोणीच्या नावावरून आरोपीस बेड्या

पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

मुंबई : नवविवाहित ३० वर्षीय महिलेचा खून करून तिचा मृतदेह गोणीत भरून रेल्वे रुळांवर फेकणाऱ्या आरोपी २१ वर्षीय विकास खैरनार या तरुणास मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गोणीवरील छापाईवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.


माटुंगा ते माहीम स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर तीन गोण्यांमध्ये महिलेचा मृतदेह असल्याचा प्रकार रेल्वेच्यागँगमनने पोलिसांच्या निदर्शनास  आणून दिला होता. या प्रकरणी तपास करताना रेल्वे पोलिसांनी सांगितले की, गोरेगाव पूर्वेत राहणाऱ्या सारिका चाळके या महिलेने आरोपी विकास कडून उसने पैसे घेतले होते. वारंवार मागणी करूनही ती पैसे देत नसल्याने विकासच्या मनात राग होता. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सॅटेलाईट टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात नेऊन त्याने तिची हत्या केली.


मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तीन गोण्यांमध्ये तिचा मृतदेह भरला. त्या गोण्या टॉवर ते गोरेगाव स्टेशन रिक्षाने आणि चर्चगेट लोकल मध्ये ठेवून गोरेगाव ते माहीमदरम्यान त्या गोण्या फेकून दिल्या. गोणीवरील 'हरिओम ड्रग गोरेगाव' छपाईवरून महिलेचा शोध घेत १२ तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली.


Press note


*आपल्या बातम्या dyendhe1979@gmail.com या इमेलवर प्रेस नोट, फोटोसहित पाठवा.*




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या