Ticker

6/recent/ticker-posts

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

मुंबई, दि.२२ : भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे काल दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.


राज्यपालांचे प्रधान सचिव  संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी, तसेच राजभवन येथील पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली.   

सुरुवातीला दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



1529

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या