ठाण्यात बोगस कॉल सेंटरवर धाड - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, २१ मे, २०२२

demo-image

ठाण्यात बोगस कॉल सेंटरवर धाड

अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या ११ जणांना बेड्या


शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करून अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या ठाण्यातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. यात ११ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून लॅपटॉप, हार्डडिस्क, मोबाईल फोन, मॉडेम, रोख रक्कम आणि इतर कागदपत्र असा सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना न्यायालयाने २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


ठाणे शहर पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांना मिळालेल्या माहितीनुसार परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे इस्टेट, किसन नगर रोड नं. १६ येथील सनराइज् बिझनेस पार्कवर छापा टाकण्यात आला. यात मीरा रोड येथील हैदर अली मन्सूरी (वय २९), कांदिवली येथील भाविन शहा(वय ३८), दहिसर परिसरातील तुषार परमार (वय ३४), मुंबई कलिना येथील रायलन कार्लोस (वय २३) आणि त्यांचे इतर साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड करत आहेत.


बोगस कॉल सेंटर चालवणारी ही टोळी अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल करून त्या स्वतः अमेरिकेतील इंटरनॅशनल रेव्हेन्यू सर्व्हिस व सेक्युरिटी सर्व्हिस अधिकारी असल्याची बतावणी करत तुम्ही टॅक्स चोरी केला आहे. त्या चोरीप्रकरणी तुम्ही दोषी आढळून आल्याने आम्ही तुम्हाला अटक करणार असल्याची धमकी देत होते. त्यानंतर तेथील आपल्याच साथीदारांना मार्फत टॅक्स व दंडाच्या नावाखाली डिजिटल गिफ्ट कार्ड द्वारे पैसे वसूल केले जात होते.












%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B8%20%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0




Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *