Ticker

6/recent/ticker-posts

नखात सुकलेल्या रक्ताच्या अंशावरून पोलिसांनी शोधला आरोपी

पाच तासांत हत्येच्या गुन्ह्याचा छडा साकीनाका पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी


मुंबई, दादासाहेब येंधे : सासूला फोन करून शिवीगाळ केली आणि चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना साकीनाका परिसरात घडली. रीमा भोला यादव असे मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी मनोज प्रजापतीला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. साकीनाका पोलिसांनी अवघ्या पाच तासांत हत्येच्य गुन्ह्याचा छडा लावला.



मूळची उत्तरप्रदेशची रहिवासी असलेल्या रिमाचा सहा महिन्यांपूर्वी मनोज सोबत विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर त्यांच्यात भांडण होत होते. त्यामुळे रीमा ही साकीनाका येथील बारदान गल्ली येथे भाड्याने राहत होती. सोमवारी रात्री रिमाचा तिच्या सासू सोबत फोनवरून वाद झाला. याची माहिती मनोजला समजली. मनोज रिमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तो राग डोक्यात ठेवून मनोजने रिमाच्या हत्येचा कट रचला.  रिमा ही घरी एकटीच राहते हे मनोजला माहिती होते. तिची हत्या करण्यासाठी सोमवारी (दि. १० मे २०२२ रोजी) पहाटे मनोज तिच्या घरी गेला.


तिच्याबरोबर चर्चा करायचे असे सांगून तो आत शिरला. त्यानंतर मनोजने रिमाच्या तोंडात रुमाल कोंबून तिचा गळा चिरून हत्या केली. हत्या केल्यानंतर मनोज हा पळून गेला. सकाळी रिमाचा मित्र दिला नाष्टा देण्यासाठी गेला असता रीमा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याला दिसली. त्याने याची माहिती साकीनाका पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रिमाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी तिच्या हत्येप्रकरणी गुन्हा नोंद केला. परिमंडळ-१०चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख, पोलीस निरीक्षक दिनकर राऊत, उपनिरीक्षक उमेश दगडे, मोमीन, सोनवणे, शेख, कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मनोजला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यानेच हत्या केल्याची कबुली दिली.


पोलिसांनी मनोजला साकीनाका येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने हत्या केल्याची  नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पण, त्याच्या हाताच्या एका नखात पोलिसांना रक्त दिसले. तो धागा पकडून पोलिसांनी तपास पुढे नेला. कसून चौकशी केल्यावर मनोजने स्वतःच हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.





Press note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या