मुंबई : रस्त्यावरून, कारमधून जाणाऱ्या चालकाचे लक्ष विचलित करून बँकेसह इतर सामान पळविणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. मुख्य आरोपीसह इतर पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेने दिंडोशी पोलीस ठाण्यातील दोन बॅग चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रिजवान शफी मुजावर उर्फ चाचा, मोहम्मद फहीम शाहीद खान, राकेश कुमार रामराज यादव उर्फ चक्की, विशाल अशोक शर्मा उर्फ लालू आणि अख्तर अन्वर शेख अशी या पाच जणांची नावे आहेत. त्या सर्वांना पुढील चौकशीसाठी दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

0 टिप्पण्या