मुंबई : पोलीस दलातील दक्षिण प्रादेशिक विभागातील ४३ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बढती दिल्यानंतर आता मध्य प्रादेशिक विभागातील ७३ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांना शासन निर्णयानुसार बढती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे येत्या काळात मुंबईतील पूर्व पश्चिम आणि उत्तर प्रादेशिक विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांनाही बढती देण्यात येणार आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक असताना त्यांनी पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचा एक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. हा प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आल्यानंतर आता मात्र, पोलीस आमदारांचा फौजदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पांडे यांनी त्याची अंमलबजावणी मुंबई पोलिस दलात करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण प्रादेशिक विभागातील ४३ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांना बढती देण्यात आली. त्यानंतर सोमवारी भायखळा येथील वाहतूक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात मध्य प्रादेशिक विभागातील ७३ सहाय्यक पोलीस उपनिरीक्ष बढती देण्यात आली आहे.
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा