आयुक्त म्हणतात, संपर्कात राहू! - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

demo-image

आयुक्त म्हणतात, संपर्कात राहू!

काही अडचणी असल्यास मोबाइलवर, 
फेसबुकवर कळवा-पोलीस आयुक्त

मुंबई : नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकरांसाठी 'चला संपर्कात राहू या' असे म्हणत समाजमाध्यमावर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. काही अडचणी भेडसावत असल्यास थेट संदेश पाठवा किंवा व्हाट्सअप फेसबुकवर भेटा असे आवाहन करीत संजय पांडे यांनी आपला स्वतःचा मोबाईल नंबर या पोस्टमधून जाहीर केला आहे. 


पोलीस दलामध्ये बदल अपेक्षित असल्यास सूचना सुचवा, असेही आवाहन त्यांनी यातून केले आहे. मुंबईकरांना उद्देशून त्यांनी  फेसबुक आणि ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे, की माझे मुंबई शहराशी आणि आपल्या सर्वांशी एक भावनिक नाते जुळलेले आहे. 


गेली ३० वर्षे मी या शहरात अणि पोलीस दलात विविध पदांवर काम करीत आहे. मुंबईकरांची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे गौरवास्पद असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे. अडचणी असल्यास ९८६९७०२७४७ या फोन नंबरवर जरूर कळवा, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

.com/img/a/

Facebook post


.com/img/a/

.com/img/a/

Twitter post


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *