Ticker

6/recent/ticker-posts

वडाळ्यात रंगीत तालीम; धारावीत गेम सात जणांना अटक

महिलेचाही समावेश, अलिगढ कोलकात्यामधून आणले होते शस्त्र

मुंबई : धारावीमध्ये गेल्या शनिवारी आमिर खान या व्यक्तीवर अंदाधुंद गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली होती. या खळबळजनक प्रकारानंतर मृत व्यक्तीची माजी प्रेयसी आणि ड्रग पेडलर महिलेसह सात जणांवर गुन्हा दाखल केला गेला होता. त्यापैकी सहा जणांच्या मुसक्या आवळण्यात क्राईम ब्रांचच्या कक्ष-५ ला यश मिळाले आहे.




गोळीबार करणाऱ्या दोघांनी अलिगढ आणि कोलकातामधून शस्त्र आणत वडाळ्यात गोळीबाराची रंगीत तालीम केली. धारावीत फायनल गेम केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले असून के कंपनीची दहशत वाढवण्यासाठीही हत्या करण्यात आल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.

कलीम सैफ सय्यद हा के कंपनीचा मोरक्या असून २०१६ मध्ये सांताक्रूझ येथे दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोक्का लावण्यात आला. सध्या आर्थर रोड कारागृहात अमली पदार्थ विक्री प्रकरणात तो जेरबंद आहे. तर अमीरवर गोळीबार करण्यात सईद शेख व बबलू मुल्ला यांचा सहभाग उघड झाला आहे.

सद्दाम शेखने गोळीबार करण्यासाठी दोघांना स्वतःच्या एक्टिवा वरून आणले. तर शोएब खान व यासीन शेख यांनी शस्त्रांचा बंदोबस्त केला. गोळीबारानंतर आरोपी पसार झाल्याने मोबाईल बंद केले. सहावा साथिदार साहिल शेख सोशल मीडियावर तपासाची दिशा दाखवत होता. साथीदार व मोक्काचा आरोपी परवेज बालवर नावाचा आरोपी पसार आहे. गोळीबार झाल्यावर कक्ष-५ चे प्रभारी पोलिस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बंडगर व पथकाने माहितीच्या आधारे तपास केला.

























Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या