Ticker

6/recent/ticker-posts

पाकीट चोरी करून पळत असलेल्या चोरास रांगेहाथ पकडले

गुन्हे शाखा लोहमार्ग मुबंई यांची जबरदस्त कामगिरी

मुंबई, दादासाहेब येंधे : पश्चिम परिमंडळ लोहमार्ग मुंबई कार्यक्षेत्रात महिला सुरक्षा पथक अंतर्गत गुन्हे शाखा गस्त घालण्याकरिता दुपारी २ वाजता मपोहवा ६१२ इंगवले , मपोना ३३८४ सुरवाडे व मपोशि ४३८ कोरडे यांना नेमण्यात आले होते. 



सदर कर्तव्य बजावित असताना अंधेरी रेल्वे स्टेशन येथील फलाट क्र.६/७ वर गस्त करीत असताना ७ वाजून ४० मिनिटाच्या वेळेस एक प्रवाशी मो.आदील मो.अरशद राईन (वय ३०) रा. अंधेरी ( पुर्व) हे अंधेरी रेल्वे स्टेशनफलाट क्र.७ वर आलेल्या चर्चगेट लोकलच्या विरार बाजूकडील महिलांच्या शेजारील डब्यातून प्रवास करून लोकल मधून उतरून ब्रिज चढत असताना त्यांच्या सॅकबॅगचे पहिल्या कप्प्यात ठेवलेले पाकिट आरोपी संदीप वसंत पांचाळ (वय ४१ वर्षे) याने चोरून पळून जात असताना वरील साध्या वेशातील महीला सुरक्षा पथकातील महीला पोलिस कर्मचारी यांनी त्यास मुद्देमालसह रंगेहाथ पकडून तक्रारदार यांचेसह अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात पोलिस उप नीरीक्षक कांबळे यांचे समक्ष हजर केले असता त्यांनी लागलीच दोन पंच बोलाऊन त्याची अंगझडती घेतली असता सदर तक्रारदार यांचे पाकिट त्या आरोपीच्या पँटच्य डाव्या खिशात मिळून आले.


त्यात १ ब्राऊन रंगाचे पाकिट त्यात ११०० रु.रोख ५०० रु. दराच्या २ नोटा व १०० रु. दराची १ नोट अशा भारतीय चलनी नोटा तसेच तक्रारदार यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोर्टीग कार्ड असे मिळून आले. पुढील कार्यवाही कामी ठाणे अमलदार यांच्या समक्ष हजर केले असून अंधेरी रेल्वे पोलिस ठाणे गुःन्हा र, न ८९९/२०२२ कलम ३७९ भा.द. वि प्रमाणे गन्हा दाखल केला आहे.














Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या