मुंबई : महावितरण महामंडळाची बोगस वेबसाईट बनवून वीज भरण्यासंदर्भात ग्राहकांना एसएमएस पाठवून फसवणूक करणाऱ्या एका ठगाला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. चरकू खूबलाल मंडल असे या आरोपी ठगाचे नाव असून तो मूळचा झारखंडच्या देवघरच्या दरबे गावचा रहिवासी आहे.
त्याच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल आणि एक सिम कार्ड जप्त केले आहे. काही नागरिकांचे विज बिल थकीत असल्याने त्याचा फायदा या सायबर ठगाने घेतला. या ठगाने बोगस वेबसाईट तयार करून ग्राहकांना बोगस एसएमएस पाठवून वीज बिल भरण्यास सांगितले होते. ही वेबसाईट आणि आलेला एसएमएस खरा समजून काहींनी वीजबिल भरणा केले होते.
मात्र, फसवणुकीचा प्रकार नंतर उघडकीस येताच अनेक ग्राहकांकडून महावितरणला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची शहानिशा केल्यावर महावितरणने सायबर सेल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
Press Note
0 टिप्पण्या