व्ही.पी. रोड पोलिसांची उत्तम कामगिरी
मुंबई : विक्रीसाठी दिलेल्या तब्बल पावणे दोन कोटींच्या दागिन्यांचा अपहार करून पसार झालेल्या ३८ वर्षीय आरोपीला उत्तर प्रदेशातील कानपूर येथून गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. यशवंत आचार्य असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळून ८३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार ५५ वर्षे सोने व्यवसायिक यांनी आचार्य याला ०१ कोटी ७७ लाख रुपये किमतीचे २५४.१५४ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी दिले होते. त्याने दागिने विकून ना रक्कम परत केली, ना दिलेले दागिने परत केले. वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती हाती लागत नव्हती. अखेरीस तो दागिने घेऊन पसार झाल्याची खात्री पटल्याने तक्रारदारांनी व्ही. पी. रोड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आचार्य याचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपी हा उत्तर प्रदेश मधील कानपूरमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन त्यास अटक केली. त्याच्याजवळून ७८ ग्रॅम चांदीचे दागिने, लगडी जप्त केल्या. तसेच तपासात त्याने काही सोने कानपूरमधील व्यापाऱ्यांना विक्री केल्याची कबुली दिली आहे.

0 टिप्पण्या