Ticker

6/recent/ticker-posts

खवले मांजराची तस्करी करणाऱ्यास अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : दुर्मिळ वन्यजीव संरक्षित असलेल्या खवले मांजराच्या साडेपाच किलो खवल्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या किरण धनवडे (वय,३१) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून बारा लाखांचे साडेपाच किलोचे खवले मांजर जप्त केले आहे.



वागळे इस्टेट परिसरात धनवडे हा खवल्याच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांना मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पथकाने वनविभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून २६ जानेवारीला त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी हे खवले मांजर कुठून मिळवले त्याचे ते कोणास विक्री करणार होते याचा तपास श्रीनगर पोलिस करीत आहेत.











Press Note



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या