मुंबई : मुंबई मेट्रो वनतर्फे घाटकोपर येथे स्थानकात महिलांसाठी देशातील पहिल्या 'वोलू पावडर रूम लाउंज' ची सुविधा देण्यात आली आहे. या सेवेचे रविवारी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
महिलांसाठीचे हे लाउंज १००० हजार चौरस फुटांचे आहे. या लाऊंजमध्ये वायफाय सुविधा, वातानुकूलित यंत्रणा, ८ स्मार्ट स्वच्छतागृहे यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चेहराओळ्ख सॉफ्टवेअरयुक्त सुरक्षितता येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. १४ आसनी कॅफे हेही या लाउंजचे एक आकर्षण आहे. अशी माहिती मेट्रो वन प्रशासनाने दिली आहे.
0 टिप्पण्या