मुंबई : पोलीस दलास कोरोनाने पुन्हा विळखा घातला असून अनेक वरिष्ठ अधिकारी करोनाग्रस्त आहेत. त्यातच पहिल्या लाटेतील लॉकडाऊन प्रमाणेच सध्या रात्रीच्या संचारबंदीमध्ये पोलिसांना काम करावे लागणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना पुन्हा थेट संपर्क येणार असल्याने पोलिसांची धास्ती अधिक वाढली आहे. त्यामुळे कर्तव्य बजावत असताना पोलिसांना सर्वतोपरी सावधानगिरी बाळगावी लागणार आहे.
संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यासाठीच्या रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी पोलिसांना नाकाबंदी, गस्त, बार, हॉटेल्स, यांचीही तपासणी करावी लागत आहे. ही कामे करताना सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात यावे लागणार असल्याने मुंबई पोलीस धास्तावले आहेत. आधीच पोलीस दलात कोरोनाची झपाट्याने वाढ होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा