सावधान, मुंबईत बाळ चोरी करणारी टोळी सक्रिय - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

सावधान, मुंबईत बाळ चोरी करणारी टोळी सक्रिय

काळाचौकी  येथून ३ महिन्याच्या बाळाचे अपहरण


मुंबई : दिनांक ३०/११/२०२१ रोजी फिर्यादी नामे सौ. सपना बजरंग मगदूम, वय ३६ वर्ष, धंदा- गृहिणी, रा.ठि. रूम नंबर १०६, पहिला माळा, संघर्ष सदन, फेरबंदर मुंबई यांनी काळाचौकी पोलीस ठाणे येथे समक्ष दिलेल्या तक्रारी वरून गु.र.क्र. ४३९/२०२१, कलम ३२८, ३६३, ३४ भा.दं.वि. अन्वये नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे पती हे कॅफेमध्ये खाजगी नोकरीस आहेत.


नमुद गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की,  तक्रारदार महिला ह्या दिनांक ३०/११/२०२१ रोजी १२:१५ ते १२:५५ वाजेच्या दरम्यान घरामध्ये एकट्याच होत्या व तीन महिने वयाची लहान मुलगी कॉटवर झोपलेली होती. त्यावेळी एक अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाची अनोळखी महीला जुन्या मोबाईलच्या बदल्यांमध्ये कपडे ठेवण्याची बास्केट विकण्यासाठी आली असता, सौ. सपना यांनी त्यांच्याकडे असलेले जूने मोबाईल देऊन प्लास्टिकची बास्केट घेण्याकरिता घरात जुने मोबाईल आणण्यासाठी आतमधील रूममध्ये गेल्या असता सदर अनोळखी महिलेने फिर्यादी यांच्या पाठीमागुन जाऊन सपना यांच्या नाकाला गुंगी आणणारे औषध लावून त्यांना बेशुद्ध करून कॉटवर ठेवलेली ३ महिने १५ दिवस वयाच्या मुलीचे अपहरण करून घेऊन गेली आहे. सदर बाबत उपरोक्त गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


अपहरण झालेल्या मुलीचे नाव :-

नाव :- कु. वेदा बजरंग मगदूम, 

वय :- 3 महिने 15 दिवस,

वर्ण :- गोरा  

कक्ष-४ पोलिसांकडून नमुद गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला आहे.

व्हिडीओ 👇पहा....सीसीटीव्ही फुटेज 




महापौर यांची प्रतिक्रिया, व्हिडिओ👇 पहा...




ता.क. :- एखादी महिला संशयास्पदरित्या आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.










Photo : viral


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज