मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याने शुक्रवारी एकच खळबळ उडाली. या पत्रातील भाषाही अश्लिल आहे. महापौरांनी याची गंभीर दखल घेत शुक्रवारी सकाळी तातडीने भायखळा पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
महापौरांच्या जुन्या निवासस्थानी हे पत्र आले असून शुक्रवारी सकाळी त्यांना मिळाले. यामध्ये माझ्याविषयी अतिशय अश्लील भाषेचा वापर करत मला व माझ्या कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्रामध्ये माझ्याविषयी असलेला मजकूर हा अतिशय लज्जास्पद असून महिलांचे विटंबना करणाऱ्या तसेच समस्त महिला वर्गासाठी वेदनादायी असा आहे. या पत्राबाबत राज्याचे गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र तसेच स्थानिक भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे, असे महापौरांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा