जीवन प्रबोधिनी ट्रस्टने साजरी केली कर्करोगग्रस्त मुलांसोबत आनंदाची आणि सामाजिक जाणिवांची दिवाळी
जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढणाऱ्या चिमुरड्यांबरोबर आज दि.३१ ऑक्टोबर २०२१ रोजी आगळी वेगळी दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमात लहान मुलांना ब्लँकेट, कपडे, खेळणी, मिठाई व इतर जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. खेळ आणि जादूचे प्रयोग सादर करण्यात आले.
तसेच विभागातील पोलीस कर्मचारी, परिचारिका, आरोग्यसेविका, मनपा कर्मचारी, समाजसेवक आदि कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा. श्री. चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त-मनपा, मुंबई, पोलीस अधिकारी श्री. मनोज मोरे, पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांचे सुपुत्र अनूप कर्णिक, श्री तरुण वर्मा, यशवंत मेस्त्री, तुषार जाधव, लेखक श्री. सोमेश कोलगे यासह संस्थेचे संस्थापक सत्यवान नर, अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस हेमंत मकवाना आणि पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस नोट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा