Ticker

6/recent/ticker-posts

अलार्म काका आपली सोसायटी सोडून गेले...

उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली जाहिरातीत काम करणाऱ्या काकांबद्दल वाईट बातमी आली समोर


दिवाळी तोंडावर आली की टीव्हीवर 'उठा उठा दिवाळी आली..., मोती स्नानाची वेळ झाली..' ही जाहिरात न चुकता आपल्याला ठराविक  वेळेनंतर एकसारखी पहावयास मिळते.


या जाहिरातीला प्रेक्षकांची पसंती देतील खूप मिळते. या जाहिरातीत पहाटेच्या वेळी दार वाजवून सर्वांना उठवणारे आजोबा म्हणजे ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. २० सप्टेंबरला वयाच्या ९६व्या वर्षी विद्याधर करमरकर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी खंत व्यक्त केली आहे. विद्याधर करमरकर हे हिंदी चित्रपट अभिनेते म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक जाहिराती साकारल्या आहेत. विद्याधर करमरकर यांना सगळेजण बाबा म्हणून ओळखत होते. विद्याधर करमरकर हे मुंबईतील विलेपार्ले येथे वास्तव्याला होते. 


सुरुवातीच्या काळात नोकरी करून त्यांनी अभिनयाची आवड जोपासली होती. विविध कार्यक्रमात ते नेहमी सहभागी व्हायचे. त्यात अनेक नाटकांचे सादरीकरण त्यांनी केले होते. तर कधी दिग्दर्शनाची धुरादेखील त्यांनी सांभाळली होती. 'एक थी डायन', 'एक व्हिलन' यासारखे अनेक बॉलीवूड चित्रपटातून त्यांनी कधी वडील तर कधी आजोबांच्या भूमिका केल्या आहेत. जाहिरातीत देखील त्यांनी काम केले आहे. यात मोती साबण, इंडियन ऑईल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचअप, लिनोवो कम्प्युटर्स, एशियन पेंट या जाहिरातींचा समावेश आहे. वयाच्या नव्वदीतही ते तरुणांना लाजवतील असे परफॉर्मर होते. एकदा चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ते आजारी पडले होते त्या अवस्थेतही त्यांनी आपल्या कामाला प्राधान्य दिले होते. 

व्हिडीओ 👇 पहा ...


















Photo, video : google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या