डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून केले जखमी
मुंबई, दादासाहेब येंधे : पदपथावर आपल्या जागेवर झोपल्याचा राग मनात धरून एका महिलेने विजय बोरसे (४९) यांच्या डोक्यात पेव्हरब्लॉक घातल्याची घटना शुक्रवारी घडली. गस्तीवर असलेले निर्भया पथकाने जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने महिलेचा शोध घेत तिला अटक केली आहे.
गोल मशिद चौकीजवळ निर्भया पथक थांबले असताना एक व्यक्ती त्यांच्याकडे आला व त्यांनी एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दिली. पोलिसांच्या निर्भय पथकाने त्याच्याकडे धाव घेत त्याला जी.टी. रुग्णालयात दाखल केले व चौकशी केली असता त्याचे नाव बोरसे असल्याचे सांगितले. तसेच संगीता परदेशी नावाच्या महिलेने त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिस ठाणेचे पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी जवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातील घटनाक्रम तपासल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने बॉम्बे दर्गा परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत बोरसे आपल्या जागेवर झोपला म्हणून हल्ला केल्याचे तिने कबुली दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा