गणेशोत्सवादरम्यान २४६ विसर्जन स्थळी १ लाख ६४ हजार ७६१ मूर्तींचे
विसर्जन
गणेशोत्सवात संकलित करण्यात आलेल्या २,६५,९८९ किलो निर्माल्यापासून
खतनिर्मिती
गेल्यावर्षी प्रमाणेच
यंदाचा गणेशोत्सव देखील कोविड या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने या
अनुषंगाने देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधात्मक सुचनांचे पालन नागरिकांनी काटेकोरपणे
करावे; त्याचबरोबर यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे
आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने व वारंवार करण्यात येत होते. या
आवाहनांना मुंबईकर नागरिकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत कोविड प्रतिबंधात्मक
उपाययोजनांची अधिकाधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यास सहकार्य करण्यासोबतच
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यास प्राधान्य दिले असल्याचे उपलब्ध
आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर मुंबईकरांच्या सहकार्याने यंदाचा
श्रीगणेशोत्सव हा उत्सवाचे पावित्र्य जपत शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न झाला आहे.
या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे,
बृहन्मुंबई व मुंबई उपनगरे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल सार्वजनिक
गणेशोत्सव महासंघ, सर्व संबंधीत संस्था आणि मुंबईकर नागरिकांचे महापौर श्रीमती
किशोरी किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी आभार
मानले आहेत.
यंदाच्या श्री गणेशोत्सवात संपूर्ण
मुंबईतील ७३ नैसर्गिक स्थळे आणि १७३ कृत्रिम तलावांमध्ये सुमारे १ लाख ५८ हजार २२९ श्री गणेशमूर्तींचे व ६
हजार ५३२ इतक्या संख्येतील हरतालिका / गौरी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.
यानुसार एकूण १ लाख ६४ हजार ७६१ मुर्त्यांचे विसर्जन श्रीगणेशोत्सव काळात करण्यात
आले आहे. विशेष म्हणजे यापैकी ७९ हजार १२९ इतक्या संख्येतील मूर्तींचे विसर्जन हे
कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले आहे. तर उर्वरित ८५ हजार ६३२ इतक्या संख्येतील
मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक विसर्जन स्थळी करण्यात आले आहे. कृत्रिम
तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या ७९ हजार १२९ मुर्त्यांपैकी ७५ हजार ६८७ या
घरगुती स्तरावरील मूर्ती होत्या. तर उर्वरित ३ हजार ५०२ गणेशमूर्ती या सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांच्या होत्या. ही आकडेवारी लक्षात घेता, कृत्रिम विसर्जन स्थळी
मुर्त्यांचे विसर्जन करण्यास मुंबईकर नागरिकांनी लक्षणीय प्रतिसाद दिल्याचे दिसून
येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ७३
नैसर्गिक विसर्जन स्थळांमध्ये ८५ हजार ६३२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये
८२ हजार ३३९ एवढ्या गणेशमूर्ती होत्या, तर ३ हजार २९३ एवढ्या हरतालिका / गौरी
मूर्ती होत्या. नैसर्गिक स्थळी विसर्जित करण्यात आलेल्या ८२ हजार ३३९
गणेशमूर्तीपैकी ७७ हजार ८१४ या घरगुती गणेशमूर्ती होत्या, तर ४ हजार ५२५ या
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती होत्या.
कोणत्या
दिवशी, किती विसर्जन? आकडेवारी
७३ नैसर्गिक व १७३ कृत्रिम अशा एकूण २४६
विसर्जन स्थळी एकूण १ लाख ६४ हजार ७६१ इतक्या संख्येतील मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये
सर्वाधिक म्हणजेच ६६ हजार २९९ इतक्या संख्येतील मुर्त्यांचे विसर्जन हे
गणेशोत्सवाच्या ५ व्या दिवशी अर्थात दिनांक १४ सप्टेंबर २०२१ रोजी झाले. तर त्या
खालोखाल ४८ हजार ७१६ इतक्या संख्येतील मुर्त्यांचे विसर्जन हे गणेशोत्सवाच्या
दुस-या दिवशी (दीड दिवस) अर्थात दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी झाले. त्यानंतर ३४
हजार ४५२ इतक्या संख्येतील मुर्त्यांचे विसर्जन हे गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी अर्थात
दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले. तर सर्वांत कमी म्हणजेच १५ हजार २९४
इतक्या मुर्त्यांचे विसर्जन हे दिनांक १६ सप्टेंबर २०२१ रोजी अर्थात
गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी करण्यात आले.
मूर्ती संकलन व विसर्जनानंतर, महानगरपालिकेच्या
घनकचरा व्यवस्थापनाने सर्व स्थळांवरील निर्माल्य संकलित करण्याचे कामकाज त्वरेने
पूर्ण केले. दिनांक १० ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधी दरम्यान एकूण २ लाख ६५ हजार
२७९ किलोग्रॅम इतके निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे
६० हजार ९०० किलो इतके निर्माल्य हे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी अर्थात दिनांक
१४ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले. या संकलित करण्यात आलेल्या विविध ३८ ठिकाणी या
निर्माल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली आहे व करण्यात येत
आहे. यानुसार बाप्पाला वाहिलेल्या दुर्वा, फुले, हार इत्यादींच्या निर्माल्यापासून
तयार करण्यात येणा-या खताचा उपयोग हा प्रामुख्याने महापालिकेच्या उद्यानांमध्ये
करण्यात येणार आहे.
मुंबईनगरीत
दहा दिवसांपूर्वी आगमन झालेल्या श्री गणरायाला मुंबईकरांनी काल (१९ सप्टेंबर २०२१)
भावपूर्ण वातावरणात नि शांततेत तसेच सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन निरोप
दिला. यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना,
कोविड
विषाणू संसर्ग लक्षात घेता, योग्य ती खबरदारी देखील बाळगणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्वांनी
सहकार्य करावे,
असे
आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी करण्यात आले होते. यामध्ये
प्रामुख्याने मास्कचा नियमितपणे व सुयोग्यप्रकारे वापर करणे, शारीरिक अंतर राखणे
आणि वारंवार हात धुणे, यासारख्या बाबींचा समावेश होता. त्याचबरोबर श्री गणेश
मूर्तीची उंची मर्यादीत ठेवणे, मिरवणुका टाळणे इत्यादीबाबत देखील
महानगरपालिकेद्वारे वारंवार आवाहन करण्यात येत होते. या आवाहनांना मुंबईकर
नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुंबईकर जनतेसमवेत महानगरपालिका प्रशासनाला
सहकार्य करणारे पोलीस दल, वाहतूक पोलीस, नौदल, इतर शासकीय व निम-शासकीय यंत्रणा,
तटरक्षक दल, हॅम रेडिओ, सर्व प्रसारमाध्यमे, खासगी तसेच
सेवाभावी संस्था यांचेही महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर व महापालिका आयुक्त श्री.
इकबाल सिंह चहल यांनी आभार मानले आहेत.
महानगरपालिकेचे ७ परिमंडळीय सह / उप आयुक्त, सर्व २४ विभागांचे
सहाय्यक आयुक्त,
त्यांची संपूर्ण यंत्रणा तसेच मध्यवर्ती यंत्रणा यांनी आपापल्या हद्दीतील गणेशोत्सवालील
सर्व कामकाज योग्यरित्या
पूर्ण केल्याबद्दलही महापौरांनी त्यांचेही अभिनंदन केले आहे.
संपूर्ण
गणेशोत्सवामध्ये मुंबईकरांच्या सेवेसाठी महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक ती
सर्व यंत्रणा उभी केली होती. ७३ नैसर्गिक व १७३ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी
मूर्ती संकलन करुन विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. विविध चौपाट्यांवरील
भुसभुशीत रेतीमध्ये वाहन फसू नये यासाठी ५८७ स्टील प्लेटची व्यवस्था करुन
तात्पुरते वाहनमार्ग तयार करण्यात आले होते. तर ७१५ जीवरक्षक अहोरात्र तैनात
राहण्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे २५ हजार कामगार - कर्मचारी – अधिकारी हे देखील
कर्तव्यार्थ उपस्थित होते. या व्यतिरिक्त मुंबईकरांच्या सुविधेसाठी ३३८
निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन,
१८५
नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र,
३९
रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच १४५ स्वागतकक्ष,
८४
तात्पुरती शौचालये, ३ हजार ७०७ फ्लड लाईट,
११६
सर्च लाईट, ४८ निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक
विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ३६ मोटर बोट व ३० जर्मन तराफा इत्यादी सेवा-सुविधा व
साधनसामुग्रींचीही व्यवस्थाही करण्यात आली होती. विविध ठिकाणी सरंक्षण
कठडयांच्या व्यवस्थेसह विद्युत व्यवस्था देखील आवश्यकतेनुसार करण्यात आली होती.
(जसंवि / ३४८)




0 टिप्पण्या